Goa Murder News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खून प्रकरणात वाढ! 60 वर्षीय कायतान डिसोजा यांची राहत्या घरी हत्या

Goa Murder News : घरातून सोन्याचे दागिने गायब झाल्याचीही माहिती मिळाली आहे. मुरगाव पोलीस संशयिताच्या शोधात असून सर्व बाजूने तपास कार्य चालू आहे.

दैनिक गोमन्तक

रविवारी (दि. 29) रात्री उशिरा कायतान डिसोजा (वय 60) उर्फ कासी याचा खून झाल्याचे आढळून आले आहे. कायतान त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने हे प्रकरण उघडकीस आले. तसेच त्याच्या घरातून सोन्याचे दागिने गायब झाल्याचीही माहिती मिळाली आहे. मुरगाव पोलीस संशयिताच्या शोधात असून सर्व बाजूने तपास कार्य चालू आहे.

मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11:30 वाजता काटे बायणा - वास्को येथे मोगाबायजवळ राहत असलेला कायतान आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्याचा मृतदेह जमिनीवर संशयास्पद पडलेल्या अवस्थेत रक्ताचे डाग आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या. सदर माहिती त्याच्या एका नातेवाईकाने पोलिसांना दिली.

कायतान डिसोझा याचा खून झाल्याची माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना तपास कार्यात सहकार्य केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुरगाव तालुका पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार उपस्थित होते. तसेच मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत, वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक घटनास्थळी हजर होते.

दरम्यान कायतान याच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात शवचिकित्सा करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार कायतान व्याजाने पैसे देत होता. कदाचित व्याजाच्या पैशावरून कायतानवर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कायतान याच्यासमवेत घरात त्याची बायको राहत होती. तसेच त्याला एक विवाहित व दोन अविवाहित कन्या असून त्या लंडन येथे स्थाईक आहेत. कायतान याचा खून झाल्याची माहिती मिळताच आमदार संकल्प आमोणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT