पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते. Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: तरुणीच्या खून प्रकरणी तपास अहवालासाठी वैद्यकीय मंडळ

तरुणीच्या वडिलांनी कळंगुट पोलीस स्थानकात (Kalangut police station) नव्याने तक्रार दाखल केली होती. त्यात तरुणीचा अज्ञाताने खून केल्याचा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: तीन आठवड्यांपूर्वी गोव्यात झालेल्या तरुणीच्या मृत्युप्रकरणी (the case of the death of a young woman) नव्याने तपास करून अहवाल तयार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने (Goa Medical College) डीन डॉ. बांदेकर (Dr. Bandekar) यांनी डॉ. वायसपन पिंटो (Dr. Wispan Pinto), डॉ. गुरुप्रसाद पेडणेकर (Dr. Guruprasad Pednekar) व डॉ. ए.व्ही फर्नांडिस (Dr. A.V. Fernandes) यांचे तीन सदस्यीय वैद्यकीय मंडळ आज स्थापन केले.

तरुणीच्या वडिलांनी कळंगुट पोलीस स्थानकात नव्याने तक्रार दाखल केली होती. त्यात तरुणीचा अज्ञाताने खून केल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Nolasco Rapos) यांनी शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar) यांना पत्र लिहून नव्याने विश्र्लेषणनात्मक अहवाल सादर करण्यास कळवले होते.

दरम्यान, तरुणीचा शवचिकित्सा अहवाल देण्यास 20 दिवसांचा विलंब तसेच मृत्युमागील कारणे पोलिसांनी उघड न केल्याने संशय अधिक बळावला आहे. ती म्हापसा बसस्टँडवर व त्यानंतर कळंगुट येथे कशी पोहचली? रात्रभर ती कुठे होती? तिच्या हातापायावर जखमा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असताना पोलिसांनी आम्हाला अंधारात का ठेवले? या एकंदर परिस्थितीवरून तिची हत्या झाल्याचा संशय असून सखोल चौकशी करण्याची मागणी तरुणीचे वडील संदीप नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT