Mumbai-Goa Highway | Crime Dainik Gomantak
गोवा

Goa-Mumbai Highway: मुंबई-गोवा महामार्गावर संशयास्पद हत्या, बंद कारमध्ये आढळला मृतदेह

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर काल संध्याकाळी ऑडी कारमध्ये एका व्यापाऱ्याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई-गोवा महामार्गावर (Goa-Mumbai Highway) काल संध्याकाळी ऑडी कारमध्ये एका व्यापाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संजय कार्ले असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तो तळेगांवचा रहिवासी आहे. ही कार गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर उभी होती. त्यामुळे व्यापारी संजय कार्ले यांची दोन ते तीन दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडी कार उभी करण्यात आली होती. ही माहिती स्थानिकांच्या लक्षात येताच पनवेल पोलिसांना दिली. कारण कारमध्ये व्यापारी संजय कार्ले यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्यानंतर पोलिसांनी कार्ले यांचा मृतदेह कारमधून बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे.

कारमध्ये संजय कार्ले यांचा मृतदेह 24 तासांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याने तो कुजलेला आहे. तसेच त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, त्याचा तपास सुरू असून शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून माहिती समोर येईल, असं पनवेल पोलिसांनी माहिती दिली आहे.

  • मृतदेह आढळलेला व्यक्ती संजय कार्ले कोण?

    संजय कार्ले हे तळेगांवात पाण्याच्या टॅंकरचा व्यवसाय करतात. कार्ले हा व्यापारी असला तो पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर तळेगांव पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. परंतु तो परोलवर सुटला होता. याशिवाय सोन्याची बिस्कीटांच्या विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT