MP Vinay Tendulkar Dainik Gomantak
गोवा

'कंठ दाटला अन् डोळे भरून आले' खासदार विनय तेंडुलकरांना राज्यसभेतून निरोप

विनय तेंडुलकरांनी सभागृहाचा निरोप घेताना राजकारणातून निवृत्त होणार नाही असे सांगत पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची विश्वास व्यक्त केला.

Pramod Yadav

MP Vinay Tendulkar गोव्याचे खासदार विनय तेंडुलकर आज राज्यसभेतून निवृत्त झाले, त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी तेंडुलकर यांची ओळख करून देत त्यांचे सभागृहातील योगदान याविषयी माहिती दिली. यावेळी तेंडुलकर यांचा कंठ दाटला आणि डोळे भरून आले. त्यांनी हळूवार हाताने डोळे पुसले.

विनय तेंडुलकरांनी सभागृहाचा निरोप घेताना राजकारणातून निवृत्त होणार नाही असे सांगत पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची विश्वास व्यक्त केला.

निरोप देताना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्हणाले?

जुलै 2017 मध्ये विनय तेंडुलकर या सभागृहात निवडून आले. तेंडुलकर एक अभियंते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी गोव्यात कॅबिनेट मंत्रीपद देखील भूषविले आहे. 2020 साली राज्यसभेत कोकणीतून बोलताना त्यांनी इतिहास निर्माण केला.

राज्यसभेतून निवृत्त झाले तरी ते पुढे देखील देशाची सेवा करत राहतील. मी त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख समुद्धी लाभावी अशा शुभेच्छा देतो. असे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्हणाले.

विनय तेंडुलकर काय म्हणाले?

विनय तेंडुलकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप पक्षाचे आभार मानले. मी आज सभागृहातून निवृत्त होत असलो तरी राजकारणातून होणार नाही. येत्या 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असे तेंडुलकर म्हणाले.

दरम्यान, विनय तेंडुलकर यांच्या जागी आता गोव्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT