Morjim | Mandre Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Morjim: मांद्रे कंत्राटदारांचा मनमानी कारभार; आगरवाडा परिसरातील नेहमीच्या वाहतूक कोंडीला नागरिक त्रासले

Morjim: मांद्रे मतदारसंघातील असलेले चकाचक रस्ते खड्डेमय आणि प्रदूषणमय झाल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Morjim: मांद्रे मतदारसंघातील विजेची समस्या सोडवण्यासाठी मांद्रे जूनसवाडा या ठिकाणी नवीन उपवीज केंद्र उभारण्यात येत आहे. त्याच बरोबर भूमिगत वीज केबल घालणाऱ्या कंत्राटदाराची सध्या मागच्या तीन महिन्यापासून मनमानी सुरू असून हवे, तेव्हा काम सुरू केले जाते.

त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोडी होत आहे. काल आगरवाडा रस्त्यांवर बराच वेळ वाहतूक कोंडीमुळे रस्ता बंद होता. वाहन चालकांना धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्याबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

21 रोजी कंत्राटदारांने अडथळा निर्माण केल्यामुळे आगरवाडा-पार्से येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काल तीन तास वाहन चालकांना दोन्ही बाजूंनी उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. मागच्या दोन महिन्यांपासून मांद्रे मतदारसंघातील मुख्य रस्ते जे रस्ते चकाचक होते ते रस्ते खड्डेमय आणि प्रदूषणमय करण्याचे काम सध्या वीज खात्याच्या भूमिगत केबल घालणाऱ्या कंत्राटदाराने करून टाकलेले आहेत.

कडक कारवाई करा

जंक्शनवरच मोठ्या प्रमाणात जेसीबीचा वापर करून दिवसा रस्ता खोदकाम करण्याचे काम कंत्राटदार मनमानी पद्धतीने करून नागरिकांना मनस्ताप देत आहे. अशा कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे अागरवाडा येथील ग्रामस्थांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT