Tax |Goa News  Gomantak digital team
गोवा

Morjim : बेकायदा घरे, दुकानांना २ टक्के टॅक्स लावणार

पेडणे पालिका बैठकीत निर्णय; नवीन इमारत कामाबाबतही चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी : पेडणे पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ‘सुडा’मार्फत उभारली जात आहे. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचे काम दिवसेंदिवस रखडत चालले आहे. त्‍यामुळे खर्चही वाढत चालला आहे. कदंब महामंडळाला सात लाखांपेक्षा जास्त भाडे द्यावयाचे आहे. ते भाडे सरकारने माफ करावे असा ठराव मांडायचा का?

अशी विचारणा नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी पालिकेच्‍या बैठकीत केली असता आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सूचना करताना सांगितले की, हे भाडे कंत्राटदाराने भरायला हवे. एका बैठकीत त्‍याच्‍याशी चर्चा करुया.

पेडणे पालिका क्षेत्रातील जी बेकायदा घरे व दुकाने आहेत, त्यांच्याकडून दोन टक्के करवसुली करणे, गटार व्यवस्था नीटनेटकी करणे, घरे-हॉटेलांचे गटारात सोडले जाणारे सांडपाणी आदी विषयांवरही बैठकीत गरमागरम चर्चा झाली. शिवाय विविध विकासकामांवर विचारविनिमय करण्‍यात आला.

आमदार प्रवीण आर्लेकर व नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांच्या उपस्थितीत झालेल्‍या या बैठकीला मुख्याधिकारी अनिल राणे, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर आणि नगरसेवक व अभियंते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT