Ganesh Chaturthi Idols Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Ganesh Chaturthi Goa: आपल्या मामांच्या आजोबांची गणपतीची चित्रशाळा, मुनांगवाडा- मोरजी येथील देऊ म्हादळेकर व यतीश म्हादळेकर या नातू आणि पणतूनी पारंपरिक पद्धतीने अजूनही चालू ठेवली आहे.

Sameer Panditrao

निवृत्ती शिरोडकर

आपल्या मामांच्या आजोबांची गणपतीची चित्रशाळा, मुनांगवाडा- मोरजी येथील देऊ म्हादळेकर व यतीश म्हादळेकर या नातू आणि पणतूनी पारंपरिक पद्धतीने अजूनही चालू ठेवली आहे.

या व्यवसायाबरोबरच खाजे, लाडू, इतर पारंपरिक मिठाई यांचा त्यांचा व्यवसायही जत्रोत्सव आणि लग्नसोहळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात चालतो. आजकाल पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होत असतानाच या नातू-पणतूंनी आपल्या आजोबांचा पारंपरिक व्यवसाय अखंडितपणे चालू ठेवलेला आहे. सध्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यावर त्यांचा भर आहे.

मूर्तिकार देऊ म्हादळेकर यांना वाटते की, प्रत्येक गणेश भक्ताने नैसर्गिक मातीपासून बनलेल्या मूर्तीचे पूजन केलं तर पर्यावरणाचीही हानी होणार नाही. आज भव्य पण हलक्या मूर्तींची मागणी वाढत असल्यामुळे बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात.

देऊ यांनी आपल्या आजोबांकडून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि तेव्हापासून त्या चित्रशाळेचे ते भाग बनले. आजही ती चित्रशाळा त्यांचे दोन मुलगे, यतीश आणि अनिकेत यांना सोबत घेऊन ते चालवत आहेत. 80 वर्षांची ही चित्रशाळा आजही गणेश मूर्ती बनवते आहे. मातीच्या उत्कृष्ट मूर्ती तयार करण्यासाठी मांद्रे गावातून चिकण माती आणावी लागते.

ती विशिष्ट माती त्याच ठिकाणी उपलब्ध आहे. गणेश मूर्ती बनवण्यासाठी भविष्यात चांगल्या दर्जाची चिकण माती मिळेल की नाही याची मात्र त्यांना भीती वाटते. आज जे दर मातीचे आहेत तेच जर भविष्यात स्थिर राहिले तरच मूर्तीकलेला वाव असेल असे म्हादळेकरांना वाटते. कलेचे हे माध्यम जोपासताना जेवढी मान-प्रतिष्ठा मिळते, ती इतर क्षेत्रांत मिळत नाही असे देऊ म्हादळेकर म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT