Manohar International Airport Mopa Goa
Manohar International Airport Mopa Goa Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: बॉम्बची अफवा पसरवल्या प्रकरणी गुजरातमधील एकजण अटकेत

Ganeshprasad Gogate

Mopa Airport: मोपा विमानतळ पोलिसांनी विमानतळावर बॉम्बची भीती निर्माण केल्याप्रकरणी विमल प्रजापती नामक व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांनी दिली आहे.

संबंधित व्यक्तीवर आयपीसी कलम 505, 336 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार स्पाइस जेट सुरक्षा व्यवस्थापक मोहम्मद सलाउद्दीन हे मोपा विमानतळावरील चेक-इन काउंटरवर असताना 06.19 वाजता SG-512/GOX-AMD फ्लाइटसाठी जाणाऱ्या विमल मणिलाल प्रजापती, (वय 38 वर्षे रा. अहमदाबाद गुजरात) या व्यक्तीने विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा पसरवली .

या घटनेमुळे एकाच खळबळ माजली. तातडीने विमानतळ प्रशानासाने सुरक्षा यंत्रणेसह पूर्ण विमानतळाची तपासणी केली.

मात्र त्यांना बॉम्ब सदृश्य कोणतीही गोष्ट आढळून आली नाही. बॉम्बची भीती निर्माण करून अफवा पसरवल्या प्रकरणी विमानतळ प्रशासनाने पोलिसांकडे सदर व्यक्तीविषयी तक्रार केल्यावर पोलिसांनी विमल प्रजापती या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT