Wild vegetables in Monsoon season Dainik Gomantak
गोवा

Rainy Season Vegetables: पावसाळी रानभाज्यांनी बाजार फुलला! चिबूड, कुर्डू, टायकिळा, बांबूचे कोंब खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Panaji Market Monsoon Vegetables: हंगामाचे पहिले पीक आणि मोजकेच चिबूड पणजीत 'चिबूड'सह, कुर्डू, टायकिळा दाखल बाजारात उपलब्ध असल्याने आकाराप्रमाणे ३०० ते ४०० रूपये एक दराने विकले जात आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हंगामाचे पहिले पीक आणि मोजकेच चिबूड पणजीत 'चिबूड'सह, कुर्डू, टायकिळा दाखल बाजारात उपलब्ध असल्याने आकाराप्रमाणे ३०० ते ४०० रूपये एक दराने विकले जात आहेत.

चिबूडासहीत बाजारात बांबूचे कोंब, फागले, कुर्डू, टायकिळा, अळू, निरफणस, भाजीची केळी, केळफुल आणि इतर भाज्या बाजारात स्थानिक महिला विकत आहेत. बांबूचे कोंब आकाराप्रमाणे १५० ते २५० रुपये प्रती नग दराने विकले जात आहेत. फागले १६० रुपये किलो, तर कुर्डूची भाजी ५० रुपयांना तीन ते चार मोळी दराने विकली जात आहे.

भाज्यांचे दर स्थिर!

राज्यात पावसाच्या कालावधीत मक्याची कणसांना मागणी वाढली असून १०० रूपयांना ६ दराने विकली जात आहेत. अनेकजण पावसात उकडून आणि भाजून खाण्यासाठी या मक्याच्या कणसांना पसंती देत आहेत. पावसाळा सुरू झाला असला तरी लिंबू अजूनही भाव खात असून मध्यम आकाराची लिंबू दहा रूपयांना ३ या दराने विकले जात असून भाज्यांचे दर स्थिर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT