Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पुढील तीन दिवस पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

येत्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची (Goa Monsoon) शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. पावसाबरोबर ताशी 30 ते 40 नॉटिकल मैल वाऱ्याचा वेग असेल, असाही वेधशाळेचा अंदाज आहे. 12, 13 आणि 14 जुलैला राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Goa Monsoon Update: Heavy rains expected in Goa in next three days)

गेल्या चोवीस तासांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या चोवीस तासांत काणकोण येथे सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून जुने गोवे 65, म्हापसा 45, पेडणे 55 ,पणजी 44, साखळी 40.1, वाळपई 49, मुरगाव 51.8 व सांगे येथे 41.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस 1 हजार 753 मि.मी. पेडणे येथे झाला आहे. येत्या तीन दिवसांत समुद्र खवळलेला राहणार असून वाऱ्याचा वेग ही ताशी 30 ते 40 नॉटिकल मैल असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT