Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात जोरदार पावसाची शक्यता! हवामान विभागातर्फे येलो अलर्ट जारी

पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे

Kavya Powar

Goa Yellow Alert: यावर्षी पावसाने जरा उशिराच हजेरी लावली मात्र नंतर त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. परंतु आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. याबाबत राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाऊस पुन्हा येणार..!

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. या पार्श्वभूमीवर IMD तर्फे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

माहितीनुसार, सासष्टी, केपे, सांगे, तिसवाडी तसेच मुरगाव तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात दडी मारली आहे. मात्र, मॉन्सूनची ही स्थिती भारतीय उपखंडाला त्रासदायक ठरली आहे.

यामुळे शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये केवळ ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसेल, असा अंदाज कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT