Tree Collapsed On Mopa Road Dainik Gomantak
गोवा

Tree Collapsed: मोपा येथील मुख्य रस्त्यावर कोसळला माड; चोर्ला घाटातही धोकादायक झाडांमुळे वाहतुकीला धोका

वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Kavya Powar

Tree Collapsed On Mopa Road: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवसांमध्ये मागील महिन्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. परिणामी राज्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मोपा येथील मुख्य रस्त्यावर दाडेश्वर मंदिराजवळ भलामोठा माड कोसळला आहे.

हे झाड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. माहितीनुसार, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परतीचा पाऊस सुरू असल्याने राज्यभर हाहाकार माजवला आहे. रस्त्यावर झाडे कोसळण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.

यामध्ये वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे चोर्ला घाटातही अनेक धोकादायक झाडे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

ही झाडे कधीही रस्त्यावर कोसळून वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळीच ही झाडे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नावेली येथे मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड एका दुचाकीवर कोसळले. यामध्ये चालक महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

पावसामुळे घडत असलेल्या या घटनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT