Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: पडझडीच्या घटनांचे सत्र सुरूच; घरांवर झाडे कोसळल्याने लाखोंचे नुकसान

सध्या पावसाने रौद्र रूप धरण केले असून राज्यभरात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: सध्या पावसाने रौद्र रूप धरण केले असून राज्यभरात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज सत्तरीमधील एक घर जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दुसरीकडे पावसामुळे, फोंड्यातील भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयाची स्थिती अत्यंक बिकट बनली आहे. दररोज कार्यालयाच्या सिलींगचा काही भाग कोसळत चालला आहे. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

मुळात या कार्यालयाची पूर्ण इमारतच जुनी असून सध्या जिर्णावस्थेत आहे. त्यामुळे त्वरित कोणतीही दुर्घटना होण्याआधी सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Slab Collapsed

दरम्यान, केरीहून केळावडे-रावणला जाणाऱ्या मार्गावर लागणाऱ्या साटी आणि गटारो या ओढ्यांना मुसळधार पावसामुळे पूर आल्याने त्यावरचे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

तर, वाळपई नगरपालिका प्रभाग 10 मध्ये नायदा रिवाज खान यांच्या घरावर पेरुचे झाड पडून 20 हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच पर्ये-सत्तरी येथे कृष्णा बाबी राणे यांच्या मातीच्या घरावर रानटी झाड पडल्याने 15 हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Goa Monsoon Update 2023

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT