Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पावसाने घेतला ब्रेक! अनेक दिवसानंतर सूर्यदेवाच्या दर्शनाने गोवेकर सुखावले

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: मागील दोन आठवडे पावसाने राज्यभर धुमाकूळ घातल्यानंतर आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचे चित्र असून हवामान खात्याद्वारे आज शनिवारी ‘यलो’, तर पुढील तीन दिवस ‘ग्रीन’ अलर्ट जारी केला आहे.

काल (शुक्रवारी) राज्यात अनेक दिवसानंतर सूर्याचे दर्शन झाले. मागील 24 तासांत राज्यात एकूण 22 मि. मी. एवढ्या पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात एकूण 2452 मि. मी. म्हणजेच 96 इंच पाऊस झाला आहे.

मागील 24 तासांत सर्वाधिक 48 मि. मी. पाऊस सांगेत पडला. गोव्यात साधारण 110 ते 130 इंच पाऊस होतो. मागील वर्षी 12 सप्टेंबर दरम्यान 100 इंच पाऊस झाला होता. यंदा आताच जुलैमध्ये पावसाने 96वी पार केली आहे

दरम्यान, पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पडझडीच्या घटना काही प्रमाणात अजूनही सुरूच आहेत. काल संध्याकाळी, पणजीतील आल्तीनो येथे पणजी पॉलिटेक्निकच्या जवळ रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्याची घटना घडली. ऑफिस सुटण्याच्या कालावधीत 6 वाजण्याच्या सुमारास हे झाड कोसळल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. पणजी अग्निशमक दालाच्या जवानांनी रस्त्यावरुन झाड हटविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT