Vijay Sardesai | Goa Monsoon Assembly 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Assembly 2023: अधिवेशनात गोवा फॉरवर्डचे 326 प्रश्न; सरदेसाईंचा सरकारवर हल्लाबोल

सरकारने विश्वासार्हता गमावली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Assembly 2023 : सामान्य जनतेचे विविध प्रश्न विधानसभेत मांडू आणि त्यांची उत्तरे सरकारकडून घेणार आहे. यासाठीच 326 प्रश्न विचारले असल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सरदेसाई म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या १० दिवसात महत्त्वाचे मुख्य असे सर्वांवर परिणाम करणारे प्रश्न विचारले जातील. आपले प्रश्न विचारले जावेत, यासाठी 1200 हून अधिक ईमेल मिळाले होते.

त्यापैंकी आम्ही 54 तारांकित आणि 270 अतारांकित म्हणून सामावून घेतले आहे आणि बाकीचे बजेट भाषणादरम्यान आणि विविध मागण्यांदरम्यान घेतले जातील.

याशिवाय आम्ही 18 लक्षवेधी सूचना आणि 18 शून्य प्रहर प्रस्ताव सादर केले आहेत, असेही सरदेसाई म्हणाले. अर्थसंकल्पीय भाषण आणि विविध खात्यांच्या मागण्यांवरील सामान्य चर्चेदरम्यान देखील आम्ही जनतेची बाजू विधानसभेत मांडणार आहे.

अनेक मुद्यांवर प्रश्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्यात वीज खंडित, मिड-डे मील, म्हादई, जमीन बळकावण्याच्या घोटाळ्याची चौकशी, कृषी आणि पारंपरिक मच्छीमारांना अनुदान, इव्हेंट्स आणि होर्डिंग/जाहिरातींवर माहिती आणि प्रसिद्धी विभागाकडून फालतू खर्च, राज्यातील गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश,

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, गोवा विधानसभेत एसटी समाजाला आरक्षण, स्मार्ट सिटी घोटाळा, राष्ट्रीय खेळ आणि खेलो इंडियामध्ये घोटाळा, वणवा, पर्यटन भागधारकांचा छळ,राज्यभरात भटक्या गुरांचा त्रास,

कला अकादमी घोटाळा, डबल ट्रॅकिंगसाठी जमीन बळकावणे, 3 मोफत गॅस सिलिंडर प्रदान करण्यात भाजप सरकारचे भाव वाढ आणि अपयश असे प्रश्न विचारले आहेत, असे सरदेसाई म्हणाले.

तीन खासगी प्रस्ताव

नगरनियोजन खात्यातील 16 बी कायदा रद्द करण्यासाठी, भाडेपट्टी तत्त्वावरील शेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) आणि वारसा (हेरिटेज) संवर्धन धोरण यावर खासगी सदस्य विधेयकावर खाजगी सदस्य ठराव मांडले आहेत. अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT