Sankhalim Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंतांनी उद्घाटन केले, तीन दिवसांत गांजे येथील पंप हाऊस वाहून गेले

गांजे येथे उभारण्यात आलेल्या पंप हाऊसचे 16 जुलै 2023 रोजी उद्घाटन झाले होते.

Pramod Yadav

गोव्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. राज्यात विविध ठिकाणी पडझड होण्यासाह नैसर्गिक अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केलेले गांजे येथील पाणी प्रकल्पाचे पंप हाऊस तीन दिवसांतच वाहून गेल्याची घडली आहे. गांजे येथे उभारण्यात आलेल्या पंप हाऊसचे 16 जुलै 2023 रोजी उद्घाटन झाले होते.

साखळी मतदारसंघातील पाळे, वेळगे आणि सुर्ला या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाळे कोथंबी येथे उच्चदाब पंप बसविण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निलेश काब्राल यांच्या सोबतीने या पंप हाऊसचे उद्घाटन केले. 16 जुलै रोजी उद्घाटन झालेला हे पंप हाऊस शेजारील नदीच्या पाण्यात वाहून गेले आहे.

या घटनेवरून काँग्रेसने भाजप सरकार आणि बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांच्यावर टीका केली आहे.

Sankhalim

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यावरून निशाना साधत भाजप सरकार भ्रष्टाचाराची फॅक्टरी असल्याचे म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेले पंप हाऊस वाहून गेले. नागरिकांचा पैसा पाण्यात गेला, भाजप सरकार भ्रष्टाचाराची फॅक्टरी झाली आहे. असा आरोप पाटकर यांनी ट्विट करत केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT