Goa Red Alert canava
गोवा

Goa Red Alert: राज्यात आज 'रेड अलर्ट'; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यातच आज, गोव्यात हवामान खात्याने (मंगळवार, 16 जुलै) रेड अलर्ट जारी केला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यातच आज, गोव्यात हवामान खात्याने (मंगळवार, 16 जुलै) रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, 17 आणि 18 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर 19 आणि 20 जुलै या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

आज रेड अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील एक ते तीन तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रासह दक्षिण आणि उत्तर गोव्यावर सध्या पावसाचे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या चोवीस तासांत म्हापसामध्ये सर्वाधिक 87.4 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल पेडणे, फोंडा आणि पणजी पावसाची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

Digital Movement: फक्त 'विरोध' आहे, 'पर्याय' नाही! डिजिटल विश्वातील उपरोधिक चळवळी का ठरताहेत पोकळ?

VIDEO: 97 रन्सवर विकेट गेली अन्...; वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला; मैदानातच दिली शिवी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT