Heavy Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Orange Alert: गोव्यात पावसाचं धूमशान! हवामान खात्याकडून आज 'ऑरेंज अलर्ट'; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Goa Orange Alert: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसानं धूमशान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसानं धूमशान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. यातच आज, गोव्यात हवामान खात्याने (बुधवार, 17 जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून 18 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर 19, 20 आणि 21 जुलै या तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' वर्तवण्यात आला आहे.

आज ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील एक ते तीन तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रासह दक्षिण आणि उत्तर गोव्यावर (North Goa) सध्या पावसाचे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT