Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात पावसाची ‘सत्तरी’ पार; तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली

मोठी पडझड : नद्या-नाल्यांनी ओलांडली सीमा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dam Water Level: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोव्यासह कोकण किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ८६.९ मिमी. (३.३८ इंच) पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १,७७९ म्हणजेच ७० इंच पाऊस पडला आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९६.७ मिमी. म्हणजेच तब्बल ७.७४ इंच एवढ्या पावसाची उच्चांकी नोंद वाळपई येथे झाली असून यंदाच्या हंगामात एका ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडण्याचा हा उच्चांकी आकडा आहे.

साखळीतील वाळवंटी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने बाजारात वाळवंटी नदीच्या किनारी असलेल्या पूरप्रतिबंधक यंत्रणेचे काम सुरू झाले आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर पंपिंग सुरू करून बाजारातील नाल्यात साचणारे पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सकाळपर्यंत पंपिंग सुरूच होते. त्यानंतर पाण्याची पातळी किंचित ओसरल्याने पंप बंद केले होते.

मंगळवारी दिवसभर तसेच रात्रभर जोरदार पडलेल्या पावसामुळे वाळवंटी नदीची पातळी रात्री वाढली होती. बाजारातील नाल्याची पातळी ३.४० मीटर, तर नदीची पातळी ३.५० मीटर झाल्यानंतर नाल्याचे गेटस् बंद करण्यात आले. दिवसभर पुन्हा पातळी न वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

पणजीत पाणीच पाणी

राजधानी पणजीत सकाळपासून उसंत न घेता पावसाची रिपरिप सुरू असल्याने स्मार्ट सिटीत सखल भागात पाणी तुंबले.

शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. १८ जून रस्ता, पणजी बसस्थानक, सांतिनेज, परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले. पाण्यातून वाहने चालवताना चालकांची दमछाक झाली.

पंचवाडी भरले, साळावलीही मार्गावर

राज्यातील धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचवाडी धरण भरून वाहत असून साळावली आणि गावणे धरण येत्या दोन दिवसांत भरतील, असा अंदाज जलस्रोत खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात दमदार पाऊस झाल्याने, राज्यातील तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पंचवाडी धरण मंगळवारपासून भरून वाहण्यास सुरवात झाली आहे, तर साळावली धरण आणि गावणे धरण केव्हाही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT