Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: पर्ये सत्तरीत मोठी पडझड ! झाडे, भिंत कोसळून 2 लाखांचे नुकसान

कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Monsoon 2023 राज्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून या कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठीं झाडे पडणे, दरडी- भिंत कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडत आहेत.

अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहीती मिळालीय. दरम्यान आज पर्ये सत्तरीत पडझडीचे सत्र आज पाहायला मिळाले.

Damage from falling tree on house

पर्येतील मधलावाडा येथील रहिवासी प्राजक्ता गावस यांच्या घरावर आंब्याचं झाड पडल पडलं असून घराच्या पडवीच्या पत्र्याचं नुकसान झालं आहे. तर दुसऱ्या घटनेत इस्माय हैदर करोल यांच्या घरावर सागवानाचे झाड पडलं असून त्यांच्या घराचं अंदाजे लाखभराचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या मुसळधार पावसाने अर्जून चंद्रू गावकर यांच्या मातीच्या घराची भिंत कोसळली असून या दुर्घटनेत त्यांचे 80 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येतेय. सुदैवाने या तिन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झाली नाहीय.

मागील 24 तासांत राज्यात एकूण 86.9 मिमी. (3.38 इंच) पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण 70 इंच पाऊस पडला आहे. गोवा हवामान खात्याने पुढील दोन - तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT