Goa Monsoon 2023: Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: वीज खांब कोलमडले, पडझडीने वाहतूक ठप्प; उत्तर गोव्याला परतीच्या पावसाचा दणका

दाणा तयार झालेले पीक शेतात पडल्यास हंगामातल्या मेहनतीवर पाणी फिरणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवलीय.

Ganeshprasad Gogate

Goa Monsoon 2023 डिचोली आणि नजीकच्या परिसरात गडगडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. दुपारपासून उत्तर गोव्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. संध्याकाळी 4 च्या सुमारास गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान या पावसामुळे तयार झालेले पीक आडवे पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरीराजा चिंतेत पडला आहे.

तालुक्यातील डिचोली-सत्तरी परिसरात आज (ता.15) दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसासोबत हवेचा वेगही प्रचंड होता. या वादळी पावसाने शेतीचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. दाणा तयार झालेले पीक शेतात पडल्यास हंगामातल्या मेहनतीवर पाणी फिरणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवलीय.

Goa Monsoon

या पावसामुळे सत्तरी भागात बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. नाणूस - फोंडा रस्त्यावर वीजखांब तुटून पडल्याने भर रस्त्यात विजेच्या तारा पसरल्या होत्या. परिणामाची या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मात्र वीज वितरणाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल होत त्यांनी महामार्गावर पडलेली झाडे तोडून आणि वीज तारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

तसेच साखळीतील वरचे हरवळे येथे वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले असून घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत झाडे हटविण्यास सुरवात केली आहे. या पावसाने नक्की किती नुकसान झालंय याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नसून पावसाच्या जोर काहीसा कमी होऊ लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT