Goa waterfalls Dainik Gomantak
गोवा

Netravali Waterfalls : नेत्रावळीतील धबधबे तूर्त पर्यटकांसाठी बंद!

वन खाते : सरपंच बुंडा वरक यांच्या मागणीवर निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Sangem : पावसाळी पर्यटनस्थळ,अशी नेत्रावळी गावाला मोठी प्रसिद्धी मिळाली असून देशी पर्यटक नेत्रावळीतील पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र, पर्यटकांच्या चुकीमुळे दुर्घटना होत असल्याचा विषय नेत्रावळीत गंभीर होऊ लागल्याने सुरक्षा उपाय कडक होईपर्यंत पर्यटकांना धबधबा दर्शन बंद ठेवावे, अशी मागणी सरपंच बुंडा वरक यांनी वन खात्याकडे केली होती.

वन खात्याने पुढील उपाय योजना केल्याशिवाय पर्यटकांना प्रवेश करता येणार नसल्याचे कळवले आहे,त्यामुळे पर्यटक म्हणून नेत्रावळीत येणाऱ्यांनी नोंद घ्यावी,असे आवाहन सरपंच वरक यांनी केली आहे.

पावसाळा सुरू होताच नेत्रावळीत पर्यटकांची गर्दी होऊ लागते. वन खात्याकडून सुट्टीच्या दिवसांत किमान दर दिवशी लाखापेक्षा अधिक महसूल गोळा होत असतो. मात्र, त्या मानाने कोणतीही सुरक्षा उपाय योजना नसल्याने पर्यटकांचा बळी जात आहे. आज पर्यंत बारा पेक्षा अधिक पर्यटकांच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

पंच राखी प्रभुदेसाई यांना रोखले

मैनापी धबधब्यावर दोन पर्यटक बुडाले. ही घटना वन खात्याच्या ढिलाईपणामुळे व कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलिस खाते कमी पडल्याची टीका करणाऱ्या नेत्रावळी पंचायत सदस्य राखी नाईक प्रभूदेसाई यांना नेत्रावळी अभयराण्याच्या गेट वर वनरक्षकांनी घटना स्थळी जाण्यासाठी अटकाव केला. पण अटकाव का, व कोणाच्या आदेशानुसार याचे उत्तर गेट वर असलेल्या वन रक्षकाने दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT