Goa Monsoon 2023 File Photo
गोवा

Goa Monsoon 2023: कष्टी-काले रस्त्यावर वाढली अपघाताची भीती; वाहनचालकांना नाहक त्रास

कष्टी-सांगे रस्त्याच्‍या दोन्ही बाजूला झाडेझुडपे रस्त्यावर आल्‍याने अपघाताची शक्‍यता

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon 2023: पावसामुळे राज्यभरात पडझड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठिकठिकणी रस्त्यावर झाडे कोसळत असल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कष्टी-काले भागात झाडेझुडपे रस्‍त्‍यावर आली असून, वाहनचालकांना त्‍याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन अपघात होण्यापूर्वी ही झुडपे कापावीत, अशी मागणी वाहनचालकांसह ॲड. अमर नाईक यांनी केली आहे.

कष्टी-सांगे रस्त्याच्‍या दोन्ही बाजूला झाडेझुडपे रस्त्यावर आल्‍याने अपघाताची शक्‍यता वाढली आहे. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानक जंगली जनावरे आल्यास दुर्घटना होऊ शकते. याच भागातून शालेय बसेस वाहतूक करीत असल्‍याने रस्त्यावर आलेली झाडे त्वरित कापणे गरजेचे बनले आहे, असे अमर नाईक यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT