Goa Monsoon 2023  Dainik Gomantak
गोवा

सतर्क रहा! गोव्यात दोन दिवस ऑरेन्ज अलर्ट; पडझड, वाहतूक कोंडीसह राज्यात कुठे काय झाले?

राज्यात आज आणि उद्या (28,29 जून) ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात दोन्ही जिल्ह्यात पावासाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड झाली असून, काही भागात रस्ते तसेच भिंत खचल्याचे प्रकार समोर आले आहे. राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले.

राज्यातील काही भागात वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली. दरम्यान, राज्यात आज आणि उद्या (28,29 जून) ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुसळधार पावासाचा इशारा

गोवा हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आजच्या (बुधवारी) दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर, 29 आणि 30 जून रोजी काही ठिकाणी जोरदार सरी बरसतील, एक जुलै रोजी देखील मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

28 आणि 29 जूनसाठी हवामान खात्याने राज्यात ऑरेन्ज अर्लट जारी केला असून, सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पडझड, रस्ते खचले, वाहतूक कोंडी; राज्यात कुठे काय झाले?

मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यात पडझड होण्यासह रस्ते, भिंत खचण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, काही भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पणजीत पावसाचे पाणी साचल्याने पाणी स्थानिकांच्या घरात घुसले, शिवाय रस्त्यावरील खड्डे आणि चिखल या समस्येने तोंड वर काढले आहे. काही भागात नव्याने केलेले रस्तेही खचले आहेत.

शिमेर आगापूर येथे 200 वर्षापूर्वीचे वडाचे झाड कोसळले आहे. श्रीराम महागुरूदेव मंदिराजळ ही घटना घडली. यामुळे दोन वीज खांब देखील कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने रस्ता देखील ब्लॉक झाला असून, त्याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

याशिवाय केपे-मडगाव मार्गाशेजारील पोर्तुगिजकालिन संरक्षक भिंतीचा काही कोसळला आहे. भिंतीच्या मध्यातील भाग खाली पडल्याने शेजारील भाग देखीळ केव्हाही कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT