Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोवा, कोकणात अतिवृष्टीचा तर, पश्चिम महाराष्ट्रात सावधानतेचा इशारा

पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: मागील काही दिवसांपासून गोवा, कोकणसह महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. गोव्यात दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली सह पश्चिम महाराष्ट्रात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रवरून दक्षिण आणि उत्तर गोव्याच्या दिशेने पावसाचे ढग येत आहेत. सध्या केपे आणि सांगे तालुक्यावरती पावसाचे ढग आहेत. असे वेधशाळेने म्हटले आहे. महाराष्ट्र आणि केरळच्या किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढग तयार झाल्यामुळे कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा, महाराष्ट्र यासह देशातील विविध राज्यात सध्या जोरदार पाऊस पडत आहे.

गोव्यात कोठे किती झाला पाऊस? (सेमी मध्ये)

म्हापसा 15, मुरगाव आणि दाबोळी 14, पणजी 12, ओल्ड गोवा 10, फोंडा 9, साखळी आणि पेडणे 8 सेमी पावसाची नोंद झाली.

तर मडगाव 6, काणकोण 5, सांगे 4 आणि केपे तालुक्यात 2 सेमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने 1,2,3 आणि 4 जुलै साठी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

SCROLL FOR NEXT