Madkai Goa Dainik Gomantak
गोवा

पती-पत्नी घरातच होते, झाड कोसळून घर जमीनदोस्त पण दैव बलवत्तर म्हणून...

दुतळे-मडकई येथे घरावर अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे.

Pramod Yadav

गोव्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दोन्ही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने झोडपून काढल्यानंतर काही भागात पडझड होण्यासह काही दुर्घटना समोर येत आहेत. मागील दोन दिवसांत झाडे उन्मळून पडणे, घरांची पडझड, वीज खांब कोसळणे, भूस्खलन आणि पाणी साचणे अशा घटना समोर येत आहेत.

दरम्यान, दुतळे-मडकई येथून एक मोठी घटना समोर आली असून, घरावर अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुतळे-मडकई येथील एका घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. दरम्यान, घटना घडली त्यावेळी घरात असलेले पती पत्नी घराच्या बाहेर धावत आल्याने सुदैवाने त्यांचा जीव बचावला.

दुतळे-मडकई येथील सखाराम नाईक यांच्या घरावर झाड कोसळल्याची ही घटना घडली. यात सखाराम आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांनाही सध्या उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम सुरू आहे. घर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने सखाराम यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गुरूवारी (29 जून) हरमलमध्ये पावसाचा जोर वाढल्याने एक झाड विजेच्या तारांवर कोसळले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तर याचा भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT