Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: पावसाचा जोर वाढणार; पुढील दोन दिवस 'यलो' तर मंगळवारपासून गोव्यात 'ऑरेंज अलर्ट'

मागील आठवड्यात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात मागील आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांसाठी 'यलो' आणि मंगळवारपासून राज्यात 'ऑरेंज अलर्ट'चा इशारा दिला आहे.

येत्या काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

मागील आठवड्यात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

गेल्या चोवीस तासांत म्हापसा 47.2, पेडणे 41.8, फोंडा 70.8, पणजी 54, साखळी 44.4, काणकोण 21.6, दाबोळी 58.6, मडगाव 47, मुरगाव 64.6, केपे 45.2 आणि सांगे 74.5 मीमी पावासाची नोंद झाली आहे.

पुढील पाच दिवसांसाठी काय इशारा

उत्तर आणि दक्षिण गोव्यात आज आणि उद्या (16,17 जुलै) काही ठिकाणी मुसळधार पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

तर, मंगळवारपासून (18 जुलैपासून) दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT