Goa monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Viral Video : नसते धाडस! पारोडा येथे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून धोकादायक प्रवास

पारोडा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Pramod Yadav

गोव्यातील मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे राज्यात चार धरणे फुल्ल झाली आहेत तर, सकल भागात पाणी साचले आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यात ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पारोडा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून मार्ग शोधत धोकादायक पद्धतीने दुचाकी घेऊन जाताना दिसत आहे.

दक्षिण गोव्यात सध्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचले आहे. विविध ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून, यावरून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. दरम्यान, पारोडा येथे एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यातून धोकादायक प्रवास करताना दिसत आहेत.

व्यक्ती पाण्यातून दुचाकी चालवत सुखरूप बाहेर येतो पण, असे नसते धाडस धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पाण्यासोबत असे स्टंट करणे टाळण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन दिवस ऑरेन्ज अलर्ट

गोव्यात पुढील तीन दिवस हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. याकाळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT