Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: मुसळधार पावसामुळे सत्तरीत घर जमीनदोस्त; 80 हजारांचे नुकसान

राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून एक ठिकाणी पडझडीच्या घटनाही वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon 2023: राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून एक ठिकाणी पडझडीच्या घटनाही वाढल्या आहेत. यामध्ये झाडे उन्मळून पडणे, घरे कोसळणे यासारख्या विविध घटना सुरू आहेत. सत्तरीमध्येही धुव्वाधार पावसामुळे एक घर जमीनदोस्त झाले आहे.

पावसामुळे गुळेली येथील पुंडलिक बिसो नाईक यांचे मातीचे घर कोसळले आहे. 13/B पैकुळ गुळेली सत्तरी असा त्यांचा पत्ता असून यामध्ये अंदाजे 80,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या वाढत्या घटनांमुळे नागरिकांचे नाहक हाल होत आहेत. दोन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट असून पावसाने क्षणभरही उसंत घेतली नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जोरदार पाऊस व सतत पडणाऱ्या मोठ्या पावसामुळे पेडणे तालुक्यात काल व आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. यामुळे पेडणे तालुक्यात सुमारे लाखोची हानी झाली असून पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांची अहोरात्र धावपळ सुरू आहे. काल संध्याकाळी पवनवाडा - केरी येथे रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर चिंचेचे मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT