Goa Monsoon 2023: Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात आत्तापर्यंत 2780 मिलीमीटर पाऊस; सप्टेंबरमध्येही पुरेसा कोसळणार

4 सप्टेंबरनंतर तापमानात घट होण्याची शक्यता

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Monsoon 2023: यंदा पावसाच्या हंगामात राज्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत. राज्यातील पावसाचे वर्तन पाहता सप्टेंबरमध्ये एकूण पावसाच्या केवळ 11 टक्के पाऊस पडतो, असे दिसून आले आहे.

राज्यात आत्तापर्यंत पावसाला सुरूवात झाल्यापासून 2,780 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आता सप्टेंबरमधील पाऊस हा राज्यासाठी बोनस ठरणार आहे.

येत्या काळात 4 सप्टेंबरनंतर तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गोव्यासाठी चांगले असेल. एन निनोच्या प्रभाव राहिला तरीही पाऊस पडू शकतो.

गोव्यात सर्वाधिक पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्ये पडतो. तथापि, या हंगामात केवळ जुलैमध्येच गोव्यात मुबलक पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये 6 ते 17 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट या कालावधीत मान्सूनच्या परिस्थितीत दोनवेळा प्रदीर्घ खंड पडला.

सध्या राज्यात कमाल तापमानात 3.3 अंश सेल्सिअसने वाढ झाली असून 2 सप्टेंबर रोजी पणजीत 32.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पावसाच्या खंडामुळे, वारे पृष्ठभागावर आणि वरच्या हवेत खूपच कमकुवत आहेत, त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता शनिवारी पुणे वेधशाळेने वर्तवली होती. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT