Goa Mla Digambar Kamat Visit Sawarde Dainik Gomantak
गोवा

Goa: आपद्ग्रस्तांना त्वरित मदत पुरवा

आमदार दिगंबर कामत यांची सावर्डेत पूरग्रस्त भागाला भेट

Dhananjay Patil

मडगाव : गोव्यातील (Goa) अनेक भागांत पुरामुळे (Heavy Rain) हाहाकार उडाला असून शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. (Flood) सावर्डे, (Sawardem) सत्तरी, (Sattari) वाळपई, (Valpoi) माशेल, (Marshel) होंडा,(Honda) सावईवेरे (Sawaiverem) तसेच इतर भागांत लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब सर्व पूरग्रस्तांना रोख मदत व एक महिन्याची जीवनावश्यक सामग्री द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Mla Digambar Kamat) यांनी केली. शनिवारी दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, (Girish Chodankar) युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सावर्डे भागातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी लोकांना जीवनावश्यक सामग्री, पाणी (Food, Water) तसेच इतर वस्तूंचा पुरवठा केला.सरकारने पाहणी अहवाल व इतर सरकारी सोपस्कारांची वाट न पाहता ताबडतोब लोकांना रोख रक्कम देणे गरजेचे आहे. लोकांचे कपडे, भांडी व इतर सर्व साहित्य पुरात वाहून गेले आहे. काणकोण येथे पूर आला, (Kankon Flood) तेव्हा माझ्या सरकारने लोकांना रोख रक्कम देत दिलासा दिला होता.

संकटकाळात लोकांना मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे कामत यावेळी म्हणाले.(Digambar Kamat) वरद म्हार्दोळकर (Varad Mhardolkar) यांनी शुक्रवारी आणि शनिवारी पूरग्रस्त भागात उपस्थित राहून मदतकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पुरामुळे हाहाकार उडाला असून, लोकांना मदत करणे आमची जबाबदारी आहे, असे म्हार्दोळकर म्हणाले. मदतकार्यात (Help Desk) कॉंग्रेसचे (Goa Congress) पदाधिकारी संकल्प आमोणकर, (Sankalp Amonkar) जनार्दन भंडारी, (Janardan Bhandari) अर्चित नाईक, (Archit Naik) साईश आरोसकर, (Saish) मनोहर नाईक (Manohar Naik) तसेच गट समित्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, सरकारने पूरग्रस्त लोकांना सर्व प्रकारची मदत करायला हवी. शुक्रवारी दिल्लीहून गोव्यात पोचल्यानंतर मी थेट सत्तरी तालुक्यात गेलो आणि युवक कॉंग्रेसमार्फत लोकांना मदत देण्याचा प्रयत्न केला. युवक कॉंग्रेस आपले मदतकार्य सुरूच ठेवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT