Goa MLA Teotinio Pereira passed away Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पावलू ट्रॅव्हल्स बससेवा सुरू करणारे तिओतिनिओ परेरा अनंतात विलिन

तिओतिनिओ परेरा हे 1963, 1967 व 1972 साली सांत आंद्रे मतदारसंघातून युनायटेड गोअन्सकडून सतत तीनवेळा निवडून आले होते

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याच्या पहिल्या विधानसभेचे सांत आंद्रेचे पहिले माजी आमदार तिओतिनिओ परेरा (91 वर्षे) यांचे काल बुधवारी पहाटे म्हापशातील खासगी इस्पितळात निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर म्हापसा येथील सेंट जेरोम चर्चच्या आवारातील दफनभूमीत गुरुवारी संध्याकाळी 4 वा. अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांनी पावलू ट्रॅव्हल्स ही आंतरराज्य बससेवा सुरू केली होती व त्याचे ते मालक होते.

तिओतिनिओ परेरा हे 1963, 1967 व 1972 साली सांत आंद्रे मतदारसंघातून युनायटेड गोअन्सकडून (युगो) सतत तीनवेळा निवडून आले. पहिल्या विधानसभेचे आमदारांपैकी ते एक होते. सांताक्रुझमधून1977 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. 1980 साली काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली व ते जिंकून आले. त्यांचा हा शेवटचा विजय होता. त्यानंतर त्यांनी 1984, 1994 व 2022 ची निवडणूक लढविली. मात्र, तिन्हीवेळी हार पत्करावी लागल्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT