goa high court.jpg
goa high court.jpg 
गोवा

Goa: दलबदलू आमदारांच्या अपात्रताप्रकरणावर आज न्‍यायालयात सुनावणी

दैनिक गोमंतक

पणजी: गोवा (Goa) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे सभापती (Speaker of the Legislative Assembly) राजेश पाटणेकर यांनी दिलेल्या निवाड्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पहिली सुनावणी 7 जून रोजी होणार आहे. (Goa MLA disqualification case to be heard in court today)

काँग्रेसच्‍या (Congress) पंधरा आमदारांपैकी दहा आमदारांनी (MLA) वेगळा गट स्थापन करून भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर या 10 आमदारांचे पक्षांतर हे बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. मात्र, सभापतींनी बराच कालावधी घेतल्यानंतर या आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला होता. हा निवाडा त्यांनी  दिल्यानंतर या निवाड्याच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे यापूर्वीच चोडणकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी उच्च न्यायालयात सभापतींच्या निवाड्याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, सदर याचिका न्यायालयाच्या कामकाजात दाखल करून घ्यावी की नाही, याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.

काँग्रेसच्या दहा आमदारांना अपात्र करण्याची याचिका गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे त्या फुटिर आमदारांच्या अपात्रताप्रकरणी पुन्हा एकदा नव्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. काँग्रेसच्या 10 आमदारांपूर्वी मगो पक्षाच्या तीन पैकी दोघा आमदारांनी भाजपात प्रवेश करून मंत्रिपद पटकावले होते, तर काँग्रेसच्या पंधरा आमदारांपैकी दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता.

महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते असलेले बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला होता. त्यामुळे आता उच्च न्यायालय  या प्रकरणी काय निर्णय देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. येत्या मार्च - एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालय सभापतींचा निवाडा फेटाळून या  फुटिर आमदारांना अपात्र करते की त्यांना अभय देते,  हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT