Mickey Pacheco Dainik Gomantak
गोवा

'केनियात जन्म, पोर्तुगालमध्ये नोंदणी', सिक्वेरांचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी पाशेकोंचे पत्र

आलेक्स सिक्वेरा यांच्या भारतीय पासपोर्टचा मुद्दा मिकी पाशेको यांनी पुन्हा उचलून धरला आहे.

Pramod Yadav

Alexio Sequeira Passport Issue: गोवा सरकारमध्ये नव्याने मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यांच्या भारतीय पासपोर्टचा मुद्दा मिकी पाशेको यांनी पुन्हा उचलून धरला आहे. सिक्वेरांचा केनियात जन्म झाला व पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद करण्यात आली आहे.

जन्म, पासपोर्ट नोंदीमुळे भारतीय नागरिकत्व गमावलेल्या इतर गोमंतकियांप्रमाणेच सिक्वेरांचा देखील भारतीय पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी केली.

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा 1957 साली केनियात जन्म झाला. 27 मार्च 2001 रोजी त्यांनी पोर्तुगालमध्ये जन्म झाल्याचे नोंदवले आहे. जन्म, पासपोर्ट नोंदीमुळे भारतीय नागरिकत्व गमावलेल्या इतर गोमंतकियांप्रमाणेच सिक्वेरांचा देखील भारतीय पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी पाशेको यांनी पत्रकार परिषदेत केलीय.

पासपोर्ट अधिकार्‍यांना मी पत्र लिहिले असून, सिक्वेरांचा पासपोर्ट रद्द केला नाही तर 15 दिवसांत पुढील निर्णय घेणार असा इशारा माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी दिला आहे.

Mickey Pacheco Letter to Passport Officer

दरम्यान, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत ‘पासपोर्ट रद्द’चा प्रश्र्न उपस्थित होता. याबाबत पाशेको यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. पण मंत्री सिक्वेरा हे पोर्तुगीज नागरिक की भारतीय आहेत, हे स्पष्ट होत नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती.

सिक्वेरा पोर्तुगीज नागरिक असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे. ‘आसेंतो दो नासिमेंतो’च्या 644-ई-1 क्रमांकानुसार पोर्तुगीज नागरिक म्हणून त्यांनी नोंदणी केली आहे. जर त्यांनी नंतर हा दाखला रद्द करून भारतीय नागरिकत्व स्वीकारले असेल तर तो दाखला दाखवावा किंवा सरकारने तसे स्पष्ट करावे, असेही पाशेको यापूर्वी म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

Artificial intelligence: शिकेल तोच टिकेल! 'एआय' टूल्समध्ये पारंगत व्हा, नाहीतर नोकरी धोक्यात

Goa Rain: सावधान! 'यलो अलर्ट' दोन दिवसांनी वाढला, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Live News: सांगे बसस्थानकासमोरील दुकानात आढळला कामगाराचा मृतदेह

Goa Film Festival 2025: 'आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना' गोव्यातील सिनेकर्म्यांची अवस्था

SCROLL FOR NEXT