Govind Gaude And Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मंत्री गावडे राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा; अमित पाटकर आक्रमक

मंत्री गोविंद गावडे यांनी विशेष निधीचा गैरवापर केल्याचा तवडकरांनी आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

Govind Gaude: गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी मंत्री गोविंद गावडे यांनी विशेष निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

यावरुन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यानी गावडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले.

'भाजप सरकार भ्रष्ट असल्याचे गेल्या दहा वर्षांपासून आम्ही वारंवार सांगत आहोत. आज सभापती रमेश तवडकर यांनीही कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांनी ‘विशेष अनुदाना’चा गैरवापर केला आहे.'

तसेच, कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप याच मंत्र्यावर आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात भाजप अपयशी ठरले आहे. ते भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देत आहेत, आसा आरोप पाटकर यांनी केला.

याआधी मंत्री माविन गुदिन्हो, रोहन खवंटे, विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत. या सर्वांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे पाटकर म्हणाले.

गावडे घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केल्यावर भाजपने कारवाई करावी, असे ते म्हणाले. सभापतींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या त्यांच्याच पक्षातील सदस्याचा पर्दाफाश करण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल, असेही पाटकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT