Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: शीशे के घरों में रहने वाले...; 20 लाखांच्या लाच आरोपावरुन मंत्री माविन यांचा मडकईकरांना सूचक इशारा

Goa Corruption News: आमदार वीरेश बोरकर यांनी सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Pramod Yadav

पणजी: मंत्र्याने साध्या कामासाठी आपणाकडून १५-२० लाख रुपये घेतले, असा आरोप केलेले माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दिला. त्याचबरोबर मडकईकर हे सुद्धा माजी मंत्री होते, असे सूचक उद्‌गार काढत त्यांनी मडकईकर यांना इशारा दिला आहे.

'काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये', अशी म्हण आहे. त्याचा अर्थ फार वाईट आहे. आरोप करणाराही त्याच वर्गातील आहे, असा त्याचा अर्थ होतो. मडकईकर यांनी काचेच्या घरावर दगडफेक करू नये, असे म्हणत गुदिन्हो यांनी मडकईकर यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा जाहीर प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आमदार वीरेश बोरकर यांनी सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे- मडकईकर यांनी केलेल्या आरोपांवर ईडी, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, माविन गुदिन्हो यांनी मडकईकर यांना सूचक धमकी दिली आहे. 'जे काचेच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर दगड फेकू नयेत, याचा अर्थ त्यांना गप्प करण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे.

कोणाकडूनही चौकशी होईल आणि कारवाई केली जाईल, अशी माझी अपेक्षा नाही! या प्रकरणी जर संबंधित प्राधिकरणे जसे की पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि दक्षता विभाग यांनी कोणतीही कारवाई केली नाही, तर याचा अर्थ भाजप सरकारने राज्यात लुटमारीच्या स्वरूपात भ्रष्टाचाराला सहज स्वीकारले आहे.

पांडुरंग मडकईकर यांनी जे म्हटले आहे ते काही नवीन नाही; मी हे विधानसभेच्या सभागृहात अनेक वेळा मांडले आणि सिद्ध देखील केले आहे. परिणामी, आता विधानसभेच्या अधिवेशनांना जाणूनबुजून कमी कालावधीसाठी घेतले जाते. जेणेकरून अधिक घोटाळ्यांचे पर्दाफाश होऊ नयेत आणि जुन्या घोटाळ्यांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT