Goa Mining Issue 
गोवा

Goa Mining Issue: शिरगाव ब्लॉकसाठी जनसुनावणी! गाव सांभाळूनच खाणी सुरू करण्याची मागणी

शिरगाव खाणीला ‘ईसी’ (पर्यावरणीय दाखला) मिळण्याचा मार्ग सोपा झाला असला, तरी न्यायालयीन वाद अडसर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या खाणीसाठी १३ जणांनी हरकती घेतल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

शिरगाव पंचायत मंडळासह बहुतांश लोकांचे मायनिंगला समर्थन असले, तरी खाणविषयक नियमांचे पालन करतानाच गावातील प्रश्न सोडवून आणि गाव सांभाळूनच खाणी सुरू करा, अशी प्रमुख मागणी आज झालेल्या जनसुनावणीवेळी एकमताने करण्यात आली.

दुसऱ्या बाजूने शिरगाव खाणीला ‘ईसी’ (पर्यावरणीय दाखला) मिळण्याचा मार्ग सोपा झाला असला, तरी न्यायालयीन वाद अडसर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या खाणीसाठी १३ जणांनी हरकती घेतल्या आहेत.

शिरगाव खाण ब्लॉक-३ अंतर्गत शिरगाव खाणीसाठी आज (गुरुवारी) जनसुनावणी घेण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता ही जनसुनावणी शांततेत पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली जनसुनावणी सायंकाळी ४.३० वाजता आटोपली.

शिरगाव खाण ब्लॉक ९५.६७१२ हेक्टर क्षेत्रफळात व्यापला आहे. प्रतिवर्ष ०.५ मिलीयन टन खनिज उत्पादन करण्यासाठी शिरगाव येथील खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. त्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो आणि उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांच्या निरीक्षणाखाली वाठादेव-डिचोली येथील नारायण झांट्ये बहुउद्देशीय सभागृहात ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार अभिजीत गावकर आदी अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल सादरीकरण केल्यानंतर जनसुनावणीस प्रारंभ झाला.

यापूर्वी खाणी कार्यरत असताना खाण परिक्षेत्रावर परिणाम झालेला नाही. उलट घरे वाढली आहेत. मंदिराचा विस्तार झाला आहे, असे विश्वंभर गावकर यांनी स्पष्ट करून आताच खाण परिक्षेत्र मुद्द्यावर बोट ठेवणे, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून खाण व्यवसाय सुरू करण्यास समर्थन दिले.

या जनसुनावणीवेळी दुपारपर्यंतच्या सत्रात बाबूसो गावकर, उदय गावकर, अमित गावकर, अजय गावकर, प्रशांत धारगळकर आदींनी आपली मते मांडली. खाण व्यवसायामुळे गावातील शेती-बागायती नष्ट झाल्यात त्याला खाणवाल्यासह काही स्थानिकही तेवढेच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत एका नागरिकाने मांडले. दुपारपर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांनी आपली मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT