Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

आढावा बैठकीत प्रक्रिया सुलभीकरणावर चर्चा

दैनिक गोमन्तक

Goa Mining: राज्यातील खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून यापूर्वीच्या दोन यशस्वी खनिज ब्लॉक्सच्या टप्प्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील खनिज ब्लॉक्सच्या ई लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

सरकारने आज राज्यातील खाणकामाशी संबंधित उपक्रमांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत खाणींच्या तिसऱ्या ब्लॉकच्या ई-लिलावाचे जलद ट्रॅकिंग, २८ व्या ई-लिलावाद्वारे लिलाव केलेल्या डंपची वाहतूक, डंप पॉलिसी आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. लॅटराइट खाण आणि वाळू उत्खननाशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

‘राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी’

१५ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी राज्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. म्हादई न्यायाधिकरण पुरस्कारानुसार पाणी वितरणासाठी स्थापन केलेल्या प्रवाह प्राधिकरणाला लवकरात लवकर पणजी येथे कार्यालय देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT