BJP | Sankalp Amonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: मुरगावात 10 वर्षे बंद असलेला खाण व्यवसाय अखेर सुरु

दैनिक गोमन्तक

Goa Mining: गोवा राज्यात दहा वर्षे बंद असलेला खाण व्यवसाय सुरळीत सुरू झाल्याने, खाणपट्ट्यातील नागरिकांबरोबर मुरगाव तालुक्यातील मुरगाव बंदरावर अवलंबून असलेल्यांनी आनंद व्यक्त केला आहे. खाण व्यवसाय सुरू करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले वचन पूर्ण करून दाखविले असल्याची माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली.

मुरगाव व वास्को भाजप मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती आमदार आमोणकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेविका श्रद्धा आमोणकर उपस्थित होते.

जयंत जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला दिलेले वचन पूर्ण करून दाखविलेले आहे. खाण ब्लाॅकचे लिलाव झाल्याने राज्य सरकारने विकासाच्या मार्गाने आणखीन एक पाऊल पुढे टाकले असून राज्यातील खाण उद्योगातील या महत्त्वाच्या घटना आहेत.

5 कंपन्यांचा सहभाग

भारतीय खाण ब्युरोच्या सरासरी विक्री किमतीच्या 63.55% लिलावाचा प्रीमियम देऊन वेदांता ही कंपनी पहिल्या खाण ब्लॉकची (जे डिचोलीच्या आसपास लामगाव, मुळगाव, मये, डिचोली, शिरगावच्या काही भागात विस्तारलेले आहे) बोलीदार म्हणून यशस्वी झाली.

या ब्लॉकचे क्षेत्रफळ 485 हेक्टर एवढे आहे. हे खाण कंपन्यांनी भरल्या जाणाऱ्या रॉयल्टीव्यतिरिक्त असेल. एकूण 5 कंपन्यांनी (वेदांत, एमएसपीएल, श्री जगन्नाथ स्टील आणि पॉवर, जेएसडब्ल्यू व आर्सेलर मित्तल) लिलावाच्या अंतिम फेरीत भाग घेतला होता.

असे आहे प्रमाण...

  • मायनिंग डंप हाताळणीची परवानगी मिळण्याकरिता गोवा सरकारने जानेवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 13 डिसेंबर 2022 रोजी गोवा सरकारने डंप हाताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाला परवानगी दिली आहे. डंपचे एकूण प्रमाण अंदाजे 700 मिलियन टन एवढे आहे.

  • गोवा सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये खाण ब्लॉक्सची लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. पहिल्या ब्लॉकची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

जयंत जाधव, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य-

पहिल्या टप्प्यातील उर्वरित 3 मायनिंग ब्लॉक्सचे लिलावदेखील 22 डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. उर्वरित ब्लॉक्समध्ये डिचोली परिसरातील आणखीन 2 ब्लॉक्स आणि काले-सांगे येथील एका ब्लॉकचा समावेश आहे. यामुळे स्थानिकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT