उगे-सांगे येथे खडीच्या खाणी (Rock mines) 1974 पासून आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa: उगेतील ‘त्या’ खाणी कायदेशीरच, खडी खाणमालकांचा दावा

सांगे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी या सोशिएदादच्या जमिनीत सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करावेत, असा इशारा दिला होता.

दैनिक गोमन्तक

केपे: उगे-सांगे येथे खडीच्या खाणी (Rock mines) 1974 पासून आहेत. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून या खाणी सुरू असून चुकीची माहिती देऊन उगेतील ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. लोकांनी त्यांच्या फसवेगिरीला बळी पडू नये. ब्लास्टिंगच्या तंत्राची चाचणी (Testing of blasting technique) करूनच सरकारने परवानगी दिली आहे. गावाबाहेरचे मोजकेच लोक स्वार्थासाठी खाणी बंद करू पाहात आहेत, असा आरोप खाणमालक आलेक्स बाप्तिस्ता (Alex Baptista) यांनी केपे येथे परिषदेत केला.

यावेळी त्यांच्यासोबत डायगो परेरा, जेसन परेरा आदी खाणमालक उपस्थित होते. सोशिएदादची जमीन परस्पर विकून टाकली हे प्रकरण अंगलट आल्याने कायदेशीर व्यवसाय हे लोक बंद करू पाहतात.

सांगेतील बेकायदा व्यावसायिकांवर बडगा

सांगे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सोशिएदादच्या जमिनीत सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करावेत, असा इशारा दिला होता. त्यामुळे त्या लोकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, असे बाप्तिस्ता म्हणाले. ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या आरोपाचे बाप्तिस्ता यांनी खंडन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT