Fast Food  Dainik Gomantak
गोवा

सावधान! GMC जवळील खाद्यपदार्थ गाडेधारकांकडून होतोय 'वेस्ट वॉटर' चा वापर, अधिकाऱ्यांनी घेतली दखल

Goa Medical College: हे पाणी हॉस्पिटलचे वेस्ट वॉटर असल्याने हे पाणी पिण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी फारसे सुरक्षित नाही.

Ganeshprasad Gogate

Goa Medical College

गोवा मेडीकल कॉलेज परिसरातील गाडेधारक आपल्या गाड्यांवर पिण्यासाठी तसेच अन्न पदार्थ शिजवण्यासाठी गार्डनच्या नळांचे पाणी (पिण्यायोग्य नसणारे पाणी) अशा पाण्याचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोमेकॉतील सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी गाड्यांवरील पाणी पिऊ नये, तसेच तेथील अन्न पदार्थ खाऊ नये अशा सूचना नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांनी दिल्याची माहिती समोर येतेय.

सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या विविध वॉर्ड/विभाग/कार्यालये/अपघात/फार्मसीच्या सर्व प्रभारींना कळविण्यात येते की, सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि गोवा मेडिकल कॉलेजसमोरील रस्त्यावर असलेल्या स्थानिक गाड्यांवरील कॅन्टीन बाहेरील अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गाडेधारक गार्डनच्या नळांचे पाणी वापरत असल्याचे दिसून आले आहे, असे याबाबत प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

पाणी हॉस्पिटलचे एसटीपी वेस्ट वॉटर असल्याने हे पाणी पिण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी फारसे सुरक्षित नाही. त्यात काही विशिष्ट जीवाणू किंवा विविध रसायनांचे मिश्रण असू शकते.

त्यामुळेच जीएमसी सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या कर्मचाऱ्यांनी उघड्यावरील गाड्या/दुकाने/कॅन्टीनमधील अन्न, पाणी किंवा कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये.

दरम्यान, या घटनेची एफडीए तपासणीसाठी होणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhadrapada Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमेवर महासंकट! चंद्र-शनीच्या युतीमुळे बनतोय खतरनाक 'विष योग'; 3 राशींचं बिघडणार गणित

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

SCROLL FOR NEXT