GMC  Dainik Gomantak
गोवा

RTI अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण दिली, GMC च्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

गोवा माहिती आयोगाच्या वतीने रुग्णालयाच्या माहिती अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आलीय.

Pramod Yadav

GMC PIO get Show Cause Notice: माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण स्वरुपात दिल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गोवा माहिती आयोगाच्या वतीने रुग्णालयाच्या माहिती अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आलीय.

अनिश बकाल यांनी माहिती अधिकाराच्या कलम ६ (१) अंतर्गत विविध ५५ मुद्यांवर माहिती मागवली होती. राज्य माहिती आयोगाने कलम आरटीआयच्या कलम २० अंतर्गत दत्ताराम सरदेसाई यांना नोटीस बजावली आहे. माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी ही कारवाई केली आहे.

माहिती अधिकारी सरदेसाई यांनी याचिकाकर्त्यांने मागवलेली माहिती अपूर्ण स्वरुपात दिली. पहिल्या अपीलनंतर त्यांनी आयोगासमोर देखील येण्यास टाळाटाळ केली. असे ढवळीकर म्हणाले.

माहिती अधिकारी ढवळीकर यांनी अपूर्ण स्वरुपात दिलेली माहिती हे योग्य नाही. तसेच, पुढील १५ दिवसांत ही माहिती मोफत दिली जावी अशीही सूचना करण्यात आली आहे.

माहिती अधिकाऱ्याची बदली झाली तरी नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याला सोपस्कर पूर्ण करावे लागेल. असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT