Mayem Ore Transportation Issue Dainik Gomantak
गोवा

Mayem Ore Transportation Issue: आता 'अशा प्रकारे' होईल मयेतील खनिज वाहतूक; निर्देश देत न्यायालय म्हणाले, दर रविवारी..

Mayem Ore Transportation Issue: गावातील अंतर्गत रस्त्याने होणाऱ्या या खनिज वाहतुकीस स्थानिकांचा विरोध आहे.

Ganeshprasad Gogate

Mayem Ore Transportation Issue: गेल्या काही महिन्यांपासून वादातीत राहिलेल्या मये गावातील खनिज वाहतूक प्रश्नाने मागील आठवड्यात पुन्हा डोके वर काढले होते.

गावातील अंतर्गत रस्त्यांवरून खनिज वाहतूक नकोच अशी गावकऱ्यांची सातत्याने मागणी असताना अद्यापही वाहतूकअन्तर्गत रस्त्यानेच होत असून काही दिवसांपूर्वी केळबायवाडा येथे स्थानिकांनी खनिज वाहतूक रोखून धरली होती.

प्रकल्प अधिकाऱ्याकडून पिशे जेट्टीला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही असे सांगितल्यावर उच्च न्यायालयाने येथील वाहतुकीबाबत महत्वाचा निर्णय दिलाय.

उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला मये गावात नियमांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने काही निर्देश दिले आहेत. त्यापैकी मये गावातील मार्गावर वायू प्रदूषण मॉनिटरिंग मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच गावातून खनिज वाहतुकीच्या डंपरच्या ज्या 150 व्हायच्या त्या कमी करून 50 पर्यंत ठेवाव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या मार्गाने खनिज वाहतुकीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या वाहतुकीचा इतिहास पहिला तर असं समजत की, पैरा येथील खाणीवरून ई-लिलावाच्या खनिजाची मये गावातून ही खनिज वाहतूक सुरू झाली आहे.

गावातील अंतर्गत रस्त्याने होणाऱ्या या खनिज वाहतुकीस स्थानिकांचा विरोध असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरत आहेत. मार्च 2022 मध्ये मये गावात खनिज वाहतुकीचा प्रश्न पेटला होता.

तीन ते चारवेळा खनिज वाहतूक रोखून धरण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश दिल्याने हा वाद काहीसा शमेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT