Goa | Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: कचरा फेकणाऱ्या 43 जणांकडून मडगाव पालिकेने वसूल केला 73 हजारांचा दंड

Margao Municipality: मागील गुरुवारी रात्री एकूण 28 जणांवर कारवाई करून 43 हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिका अभियंता देसाई यांनी दिली.

सुशांत कुंकळयेकर

Margao Municipality: मडगाव पालिकेने पालिका हद्दीत बेकायदा कचरा फेकणाऱ्यांविरुद्ध हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 43 जणांना पकडून 73 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पालिका अभियंता दीपक देसाई यांनी दिली.

पालिका हद्दीत बेकायदा कचरा फेकण्याचे प्रकार पालिकेने गंभीरपणे घेत ही मोहीम हाती घेतली आहे. 23 जणांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे.

आठवडाभरापूर्वी धडक मोहीम राबविताना 28 जणांना कचरा फेकताना पकडून 43 हजारांचा दंड वसूल केला होता. त्यानंतर 18 जणांवर कारवाई करून 24 हजारांचा, तर नंतर एकाला पकडून 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पालिकेकडून नियोजन करून आकस्मिकरीत्या ही मोहीम राबविली जात असल्याचे देसाई यांनी नजरेस आणून दिले. यापुढेही जोमाने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.

पालिका अभियंता दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळी पथके विविध ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी तैनात करून ही मोहीम राबविण्यात आली. काही जण पंचायत क्षेत्रातील घरगुती कचरा टाकत असताना, तर काही जण हॉटेल वा चिकन स्टॉलवरील कचरा आणून टाकताना सापडले असता त्यांना पकडून दंड ठोठावण्यात आला.

जास्तीत जास्त 5 हजार, तर काही जणांना दोन-तीन हजार व काहींना 500 रु. या प्रकारे दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालिकेने मागील गुरुवारी रात्री एकूण 28 जणांवर कारवाई करून 43 हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिका अभियंता देसाई यांनी दिली.

फातोर्डा परिसरात घरोघरी कचरा उचल करणाऱ्या ग्रीन ग्लोब या यंत्रणेच्या प्रतिनिधींनीही या कारवाई मोहिमेत सहभागी होऊन मदत केल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT