World Tribal Day Dainik Gomantak
गोवा

World Tribal Day: ‘आदिवासी’ भारतीय संस्कृतीचे मूळ, वनांचे रक्षण हेच त्यांचे प्रमुख ध्येय- पिल्लई

राज्यपाल पिल्लई : मडगावात जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान

गोमन्तक डिजिटल टीम

World Tribal Day भारतीय परंपरा, संस्कृती व वारसा याचे मूळ स्रोत आदिवासी समाजामध्ये असल्याचे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. अनुसूचित जाती व जमाती आयोगाने मडगावात आयोजित केलेल्या जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्यपालांनी सांगितले की, इतर देशांची संकल्पना ही मानव जातीच्या सभोवती गुरफटलेली आहे, पण भारताची संकल्पना ही पर्यावरणावर केंद्रित आहे. याचे कारण आदिवासी समाजाने आपले जीवन निसर्गाच्या सान्निध्यात व त्याचे जतन करण्यास समर्पित केले.

खास करून वनाचे रक्षण हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. आता हळूहळू इतर देश सुद्धा भारताप्रमाणे पर्यावरणीय संकल्पनेचा आधार घेऊ लागले आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर, आंतोनियो वाझ, नागपूरचे प्रो. मधुकर विके, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, अखिल भारत आदिवासी कर्मचारी महासंघाच्या गोवा प्रमुख उपासो गावकर, अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सचिव दीपक करमलकर, दशरथ रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात पोलिस अधिक्षक गुरुदास गावडे, पोलिस अधिक्षक विश्राम बोरकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, मेट्रोलोजी खात्याच्या संयुक्त संचालक रंजना बोरकर, जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता अंकुश गावकर, निवृत्त अधिकारी मधुकर कुंकळीकर, तसेच रामनाथ गावडे गावकर, गजानन रायकर, ज्योयसी डायस, पुष्पलता आर्लेकर रेडकर व भालचंद्र उजगावकर यांचा यात समावेश होता.

तसेच देशभरातील अनेक मान्यवरांनाही राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रो. मधुकर विके यांनी अखिल भारत आदिवासी कर्मचारी महासंघाच्या कार्याची व कामाची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रकृती स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT