Goa News | Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa News: स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची दुरुस्ती होणार- दिगंबर कामत

Goa News: कालकोंडात 14.70 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्‍घाटन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Digambar Kamat: स्वच्छ भारत अभियांनातर्गत मडगावातील शौचालयाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी कालकोंडा येते शौचालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी सांगितले. कालकोंडा येथे 14.70 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्‍घाटन करण्यात आले.

श्री कृष्ण मंदिरात आधार कार्ड शिबिराचा शुभारंभही केला. याप्रसंगी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर. उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक महेश आमोणकर व अन्य उपस्थित होते. या शिबिरांतर्गत ज्यांच्याकडे अजूनपर्यंत आधार कार्ड नाही, त्यांनी कार्ड करावे. उद्या हे शिबिर मालभाट येथील साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आयोजकांतर्फे देण्यात आली.

आमदार कामत म्हणाले, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मडगावमधील सर्व सार्वजनिक शौचालयांचे दुरुस्ती केली जाईल. हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सहा शौचालयाच्या दुरुस्तीसाठी राज्य व केंद्र सरकारने मान्यता दिली असून अनुदानही मंजूर केले आहे. दुसऱ्या टप्प्यांतील शौचालय दुरुस्तीचा प्रस्ताव नगरपालिकेतर्फे राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.

मडगावात वाहन पार्किंग संदर्भात कडक उपाय योजिले जातील. आपण हल्लीच अधिकारी व वाहतूक पोलिसांसमवेत स्टेशन रोड भागाची पाहणी केली आहे. पुढील 15 दिवसात हा भाग स्वच्छ होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.

25 लाखांची वसुली!

नगरपालिकेने 12 दिवसात 25 लाख रुपयांची वसुली केल्याचे त्यांनी सांगितले. हे काम असेच चालू राहील, तेव्हा सर्व आस्थापनांनी, नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच ज्यानी व्यापारी परवाना काढला नसेल, त्यांनी तो काढावा, असे आवाहनही नगराध्यक्षांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT