Margao Crime Case: मडगावातील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत रविवारी कचरा टाकण्यावरून झालेला वाद आणि वादातून नंतर घडलेल्या मारहाण प्रकारानंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
भाजपचे माजी प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्ज यांनी हा प्रकार म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिलीय. एखाद्या समुदायाच्या संवेदनशील भागात कचरा फेकण्यामागचे तर्कशास्त्र मला समजले नाही.
धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भागात कचरा फेकणे आणि कचरा फेकू नका असे सांगणाऱ्यांना मारहाण करून गुंड म्हणून काम करणे ही विकृती असल्याची प्रतिक्रिया सॅव्हियो रॉड्रिग्ज यांनी दिलीय.
हिंदू स्मशानभूमीत कचरा फेकल्याच्या प्रकरणातील हल्लेखोरांविरुद्ध फातोर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आलीय.
तरी आता शांत राहून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. धार्मिक संवेदनशील परिसरात कचरा टाकण्याचा आणि कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचेही रॉड्रिग्ज म्हणाले
मडगावातील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत रविवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कचरा फेकण्यासाठी आलेल्या इसमांला हटकले आणि त्याला कचरा न टाकू दिल्यामुळे दवर्ली-दिकरपालचे पंच सदस्य साईश राजाध्यक्ष तसेच स्मशानभूमीची देखरेख करणारे जयवंत फोंडेकर यांच्यावर चॉपर आणि इतर शस्त्रांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं शोध घेत जाफर बसू, अफझल शेख, जाफर खान, साबुद्दिन काडकोल, नासीर शेख, कुडतरी येथील मंजुनाथ हरिजन आणि निजाम बसू सातही हल्लेखोरांना अटक केली. तसेच त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.