Rice Inquiry | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: अतिरिक्त तांदूळ साठ्याची चौकशी

Goa News: पुरवठा खात्याचा माल स्वस्त धान्य दुकानात न जाता परस्पर बाहेर व्यापाऱ्यांना विकला जातो.

दैनिक गोमन्तक

Goa News: नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात सडलेली तूरडाळ आणि खराब झालेल्या साखरेच्या गंभीर प्रकरणानंतर आता नागरी पुरवठा खात्याचा माल स्वस्त धान्य दुकानात न जाता परस्पर बाहेर व्यापाऱ्यांना विकला जातो, अशा तक्रारी आल्या होत्या.

त्यानुसार बुधवारी नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केपे येथील गोदामाची आकस्मिक तपासणी केली असता 155 गोण्या तांदूळ अतिरिक्त मिळाल्याने या खात्याचे केपेचे निरीक्षक गोरख राजाध्यक्ष यांना निलंबित केले.

हा अतिरिक्त साठा का ठेवला होता त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी गोदामप्रमुख महादेव रेड्डी यालाही निलंबित केल्याची माहिती दिली. दरम्यान, यापूर्वी सडलेली तूरडाळ आणि खराब झालेल्या साखरेच्या प्रकरणात या खात्याच्या माजी संचालकांना कारवाईस सामोरे जावे लागले होते.

आता तांदळाच्या साठ्यामुळे पुन्हा एकदा हे खाते चर्चेत आले आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी पुरविण्यात येणारा माल कर्नाटकआणि महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना विकला जातो, अशा तक्रारी होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT