Canteen Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan Margao: प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी ! रवींद्र भवनचे कॅन्टीन लवकरच खुले होणार...

राजेंद्र तालक यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र भवनची नवीन कार्यकारिणी समिती जाहीर झाली व त्यांनी कॅन्टीन सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ravindra Bhavan Margao जवळ-जवळ चार वर्षांपासून बंद असलेले मडगाव रवींद्र भवनचे कॅन्टीन खुले करण्याची वेळ अगदी जवळ पोहोचली आहे. कॅन्टीन बंद असल्यामुळे तियात्रिस्तांसह ज्या संस्था किंवा व्यक्ती रवींद्र भवनमध्ये आपले कार्यक्रम आयोजित करीत त्यांना खाण्यापिण्याचा त्रास जाणवत होता.

प्रेक्षकांची तर अगदी गोची होत असे. आता राजेंद्र तालक यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र भवनची नवीन कार्यकारिणी समिती जाहीर झाली व त्यांनी कॅन्टीन सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.

कॅन्टीनसाठी मागितलेल्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. यावेळी दहा स्वयंसाहाय्य गटांनी निविदा भरल्या होत्या. त्यातील मडगावच्या अष्टविनायक गटाने सर्वाधिक महिनाकाठी ६० हजार रुपयांची निविदा भरल्याने त्यांना कॅन्टीन चालविण्याचे कंत्राट देण्यात येईल, असे वाटते.

सध्या आदेश जारी करण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत पूर्ण होईल व अंदाजे १५ ऑगस्टपूर्वी कॅन्टीन सुरू केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रवींद्र भवनतर्फे कॅन्टीनसाठीच्या सर्व सुविधा कंत्राटदार स्वयंसाहाय्य गटाला पुरविण्यात येणार आहे. कॅन्टीन सर्वांसाठी खुले असेल.

काही व्यक्तींना आपल्या लहान-सहान बैठका वगैरे घेण्याची परवानगी इथे दिली जाईल. शिवाय दुपारी जेवण वगैरेची सोय इथे केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मडगाव रवींद्र भवनमधील या कॅन्टीनचा फायदा येथे कार्यक्रमांसाठी येणाऱ्या कलाकारांना होईल. वेळेअभावी घरी जाता न येणाऱ्यांसाठी कॅन्टीन गरजेचे आहे.

ध्वनियंत्रणा सुधारण्याची मागणी

पाय तियात्रिस्त सभागृहाची ध्वनियंत्रणा सुधारण्याचे नूतन समितीचे पुढील पाऊल असेल. समितीने कला व संस्कृती खात्याला यासंदर्भात कळविले आहे. तियात्रिस्त व कलाकारांची ध्वनियंत्रणा सुधारण्याची मागणी होत आहे.

स्वच्छतेवर भर : मडगावच्या रवींद्र भवनला भेट दिल्यास स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसत आहे. शौचालयातील काही मुताऱ्या दुरुस्तीसाठी काढलेल्या आहेत तर ज्या आहेत त्या स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. या कामासाठी भवनमधील मल्टिटास्किंग कर्मचारी वर्ग कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT