Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: होलसेल मासळी मार्केटचा कचरा थेट शेतात; गलिच्छ प्रकाराबाबत स्थानिक आक्रमक

Margao News: घाऊक मासळी बाजारात अनेक वेळा मासळीचा कचरा दुर्लक्षित राहतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News: मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात स्वच्छता राखण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही या मार्केटमधील सांडपाणी व कचरा जवळ असलेल्या मोकळ्या शेतात सोडला जात आहे.

यामुळे हा परिसर गलिच्छ झाला असून दुर्गंधीही पसरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

घाऊक मासळी बाजारात अनेक वेळा मासळीचा कचरा दुर्लक्षित राहतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मासे कापता होणारे सांडपाणी जवळच्या शेतात सोडले जाते.

काही महिन्यांपूर्वी घाऊक मासळी बाजारातील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने यंत्रणा बसविण्याचे प्रयत्न करूनही या बाजारपेठेत अस्वच्छ परिस्थिती कायम आहे.

यापूर्वी एसजीपीडीएने मासे कापणाऱ्यांना सक्त ताकीद देऊन मार्केटमध्ये स्वच्छता राखण्याविषयी सूचित केले होते.

तरी स्थितीत काही बदल झालेला नाही. या प्रकाराला माडेल रहिवाशांनी जोरदार आक्षेप घेतला होता.

घाऊक मासळी बाजारातील मासे कापणाऱ्या कामगारांच्या प्रक्रियेवर कडक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

हे कामगार मासळीचे अस्वच्छ पाणी जवळील शेतात सोडून साळ नदी प्रदूषित करणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT